लोहीया विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती, बाळ गंगाधर टिळक तथा जमनादेवी लोहिया यांची पुण्यतिथी साजरी
सौंदड- येथिल लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेव बाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा,सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने ,लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयात आज दिनांक १ ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक , जमुनादेवी लोहिया यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोहिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.आ .न. घाटबांधे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल ,मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे, प्राध्यापक मा.आर.एन.अग्रवाल , मा.डी.एस.टेंभुर्ण, मा.जी.एस.कावळे उपस्थित होते. यांनी प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या लोकमान्य टिळक, जमुनादेवी लोहिया व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दोन मिनिटांचे मौन पाळून या थोर आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विद्यालयातील वर्ग 9 वी ची विद्यार्थिनी सलोनी लांजेवार हिने आपले मनोगत व्यक्त केले तसेच मा.शिंदे सर मा. बाच्छल मॅडम यांनी आपल्या भाषणातून जमुनादेवी लोहिया ,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे यांचा जीवन परिचय व त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली .कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स. शि.आर आर . मोहतुरे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक श्री . टी . टी.निमजे यांनी मानले.