सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी विचार मंथन सभा व सत्कार समारोह संपन्न
सडक अर्जुनी / गोंदिया – तेजस्विनी लॉन,सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “राष्ट्रवादी विचार मंथन सभा व सत्कार समारोह” माजी आमदार श्री. राजेंद्र जैन व आमदार श्री. राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनश्च अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री राजेंद्रजी जैन व संचालक पदी नव निर्वाचित आमदार श्री राजकुमार बडोलेजी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते व युवावर्ग यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाला सर्वश्री राजेंद्र जैन, राजकुमार बडोले, देवेंद्रनाथ चौबे, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, किशोर तरोणे, सुधाताई रहांगडाले, अविनाश काशिवार, रजनी गिरेपुंजे, डी यु रहांगडाले, शिवाजी गहाणे, तेजराम मडावी, रमेश चुऱ्हे, वंदना डोंगरवार, देवचंद तरोणे, आनंद अग्रवाल, गजानन परशुरामकर, अजय लांजेवार, दिनेश कोरे, श्री लोहियाजी, दीक्षाताई भगत, दाणेश साखरे, शाहिस्थाताई शेख, सुधाकर पंधरे सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.