ज्या ठिकाणी बैलबंडीने वाळू चोरी होणार तेथील तलाठ्यांचे वेतनवाढ थांबणार – SDO वरून कुमार शहारे
सडक अर्जुनी – तालुक्यातील संपूर्ण रेतीघाट सध्या बंद आहेत. काही रेती घाटात पाणी असल्यामुळे ट्रॅक्टरने अवैध प्रकारे रेती चोरी करणे कठीण असते ,तरीसुद्धा रेती तस्कर ट्रॅक्टरने रेती चोरी करतातच. रेती चोरी करणाऱ्या वाहनावर पोलिस विभाग आणि महसूल विभागाने कारवाया चा सपाटा लावला आहे.
तर दुसरी कडे बैल बंडीने अवैध रेती चोरी करणाऱ्यांना सध्या सुगीचे दिवस पहावयास मिळतात.
सडक अर्जुनी तालुक्यात सध्या बिना परवानगी ने मोठ्या प्रमाणात अवैध प्रकारे बैल बंडीचे रेती वाहतूक होताना दिसत असल्याचे अर्जुनी मोर चे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांना माहिती मिळाली.
उपविभागीय अधिकारी कार्यालय द्वारे दिनांक 4 ऑगस्ट 25 रोजी तहसील कार्यालय सडक अर्जुनी यांना एका आदेशान्वित पत्राद्वारे कळविण्यात आले की,
सडक अर्जूनी तालूक्यातील रेतीघाटामधून मोठया प्रमाणात रेती तस्कर हे 50 ते 75 बैलबंडीद्वारे रेतीचा उपसा करून अवैध रेती करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर अवैध रेती वाहतूकीमूळे शासनाच्या महसूलाचे खुप मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. गौण खनीजाच्या स्वामीत्व धनावरील जास्तीत-जास्त महसूल वाढीव होण्याच्या दृष्टीने सन 2025-26 या वर्षा करीता 0853- गौण खनीज उत्खनन नियमापासून मिळणाऱ्या रक्कमा अंतर्गत प्रपत्र- ब मध्ये वसूली बाबत तालूका सडक अर्जूनी करीता 323.58 लक्ष उदिष्ट आपणास वाटप करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांनी निश्चित केलेल्या महसूल वसुलीचे उदिष्ट कार्यपध्दतीचा अवलंब करून दिनांक 31.03.2026 पूर्वी न चुकता साध्य करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत.
त्या अनुषंगाने रेती घाटामधून मोठया प्रमाणात बैलबंडीद्वारे रेतीचा उपसा करून अवैध रेती वाहतूकीला आळा घालण्यात यावे. तसेच सन 2025-26 या वर्षाकरीता प्रपत्र-ब वसूलीचे उदिष्टाची पूर्तता करण्याकरीता व अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्या करीता तालुकास्तरावर भरारी पथक तयार करण्यात यावे. शासनाने विहीत केलेले उदिष्ट गाठण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करावे.
ज्या रेतीघाटामधून मोठया प्रमाणात अवैध बैलबंडीद्वारे वाळु वाहतुक सुरू आहे तेथील तलाठी यांचे वेतनवाढ थांबविण्यात येथील अशा प्रकारे माहिती तहसीलदार सडक अर्जुनी यांना देण्यात आली.
सूत्राने दिलेल्या माहिती नुसार 4 ऑगस्ट रोजी सौंदड येथे 10 ते 15 अवैध रित्या रेती चोरी करणाऱ्या बैल बंडी धारकांवर कारवाई करण्यात आली. आता मात्र सडक अर्जुनी तालुक्यात बैल बंडी द्वारे अवैध रित्या रेती वाहतूक करण्यात आले असता त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात येणार असे उपविभागीय अधिकारी कार्यालय द्वारे सांगण्यात आले.