सडक अर्जुनी शहरावर ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर, नगरपंचायत द्वारे कार्यान्वित
सडक अर्जुनी – ( डॉ.सुशिल लाडे) – नगरपंचायत सडक अर्जुनी मध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे कित्येक वर्षापासून नागरिकांची मागणी होती.
अनेक वर्षाची प्रतीक्षा असलेले सडक अर्जुनी शहरा मध्ये मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यात दुर्गा चौक, बाजार चौक ,शेंडा मार्ग,स्मशान घाट, शहरातील एन्ट्री, एक्झिट , आणि पोलिसांनी कळविलेल्या ठिकाणी कॅमेरे लावण्यांत आले आहेत.

संपूर्ण कॅमेऱ्याचे कंट्रोल हे पोलिस स्टेशन डूग्गीपार येथे असणार आहे. तर काही कॅमेऱ्याचे डिस्प्ले (कंट्रोल) हे नगरपंचायत सडक अर्जुनी कडे असणार आहे. तसेच आणखी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात त्यात नागरिक, शालेय विद्यार्थी,महिला, शासकीय कर्मचारी यांना सुरक्षा वाटू लागली आहे आणि होणाऱ्या चोऱ्या, गुन्हेगारी , अपघात लक्षात घेता नगरपंचायत ने संपूर्ण शहराला सीसीटीव्ही च्या निगराणीमध्ये बसविले आहे.

यातील पहिल्या टप्प्यात ३२ कॅमेरे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्ह्यांपासून प्रवासी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सुरक्षेबाबत नागरिकांना दिलासा मिळाला असून सडक अर्जुनी शहरातून गोंदिया, मार्ग आहे. त्याचप्रमाणे शासकीय कामाकरीता तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयात बाहेरील नागरिक येत असतात.

या मार्गावरील तालुक्यातील शासकीय कामा करिता येणारे नागरिक प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. स्थानक परिसरात अनेक प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. या मार्गावर महिला, वृद्ध, विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करीत आहेत. सडक अर्जुनी शहर हे दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यातच शहरातील अनेक भागांत चोरीच्या घटनांत ही वाढ होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे वाहन चोरी व इतर घटनाही घडत आहेत. या घटनांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचे नियोजन झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून आणखी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याचा सर्व कंट्रोल दुग्गीपार पोलिस स्टेशन कडे असेल”.
नगराध्यक्ष – तेजराम कि. मडावी