Saturday, August 23, 2025
सड़क अर्जुनी

लोहिया विद्यालयात ‘ हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत ध्वजारोहण संपन्न

सौंदड :- लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथ.शाळा, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत दि.13 ते 15 ऑगस्ट 2025 या दरम्यान विविध कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांतर्गत आज दि.13 ऑगस्ट 2025 रोज बुधवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक-संस्थाध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने विद्यालयाच्या प्राचार्या मा.उमा बाच्छल यांच्या शुभहस्ते मा.आनंदराव घाटबांधे ,उपाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था, मा. शमीम अ.सय्यद , प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे प्राध्यापक आर.एन.अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर लगेच राज्यगीत , पसायदान याचे गायन करण्यात आले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून विद्यार्थी अमली पदार्थापासून दूर राहण्याकरता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री.डी.एस.टेंभूर्णे यांनी तंबाखू मुक्तीची सर्वांना शपथ दिली.

error: Content is protected !!