सडक अर्जुनी येथे तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सव संपन्न
सडक अर्जुनी – आज दिनांक १४/०८/२०२५ रोजी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग याचे वतीने तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी कार्यालय परीसर, सडक/ अर्जुनी येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री. चेतनजी वडगाये, सभापती, पंचायत समिती, सडक/अर्जुनी यांचे हस्ते पार पाडण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री. शिवाजी गजानन गहाणे प. स. सदस्य क्षेत्र कोकणा/जमी., मा. श्रीमती कवीताताई रंगारी जि.प.सदस्य क्षेत्र चिखली, मा.श्री.अल्लाउद्हीन राजानी प. स. सदस्य क्षेत्र शेंडा, मा. श्रीमती इंद्रायणी गोमासे तहसिलदार सडक/अर्जुनी प्रामुख्यानी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर.एस. लांजेवार तालुका कृषी अधिकारी सडक/अर्जुनी यांनी केले तर कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख उपस्थितीत असलेले मान्यवर यांनी रानभाजी प्रदर्शन व विक्री स्टॉलला भेट देऊन पाहणी केली व आपल्या प्रमुख मार्गदर्शनात जास्तीत जास्त प्रमाणात नागरीकानी रानभाजी आपल्या दैनदिन आहारामध्ये समावेश करावा व मानवी आरोग्य, हिताचे दृष्टीकोणातुन या महोत्सवात रानभाजी खरेदी करावे जेणेकरून रानभाज्या विषयी जनजागृती निर्माण होऊन वाव मिळेल असे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील नागरिक मोठे संख्येनी सहभागी झालेत तसेच कृषी विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उमेद, माविम व ईतर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठे संख्येनी सहभाग नोंदविला. या महोत्सवामध्ये रानभाज्याचे स्टॉल लावणारे व्यकतीक शेतकरी, शेतकरी गट, मावीम व उमेदचे महिला गट यांना मान्यवराचे हस्ते प्रोत्साहानपर प्रशस्ती पत्र देण्यात आले व तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे समारोप करण्यात आले.
सदर महोत्सव कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता श्री. एल. एस.पाठक मंडळ कृषी अधिकारी सडक अर्जुनी, श्री. एस. डब्लु. मोटघरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सडक अर्जुनी श्री. एम. एम. भालाधरे कृषी अधिकारी सडक अर्जुनी, श्री. एस.एफ.वाघाये उप कृषि अधिकारी सडक अर्जुनी, श्री. रजनीश पंचभाई उप कृषि अधिकारी सडक अर्जुनी, श्री. जी.एस.मस्के सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सडक अर्जुनी व सर्व सहाय्यक कृषि अधिकारी यांनी उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले.