पोलिसांनी काढली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने बाईक रॅली
सडक अर्जुनी – सद्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सुरु असून दिनांक 15/08/2025 रोजी पोलिस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रात 11/00 वा. ते 12/00 वा. दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, रॅलीमध्ये पोस्टर/बॅनर द्वारे अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे नुकसान याबाबत जनजागृती करण्यात आली. सदर रॅली पोलीस स्टेशन डुग्गीपार येथून सुरु करून नगरपंचायत समोरील रोडाने शेंडा चौक ते कोहमारा चौक ते परत पोलीस स्टेशन येथे समाप्त करण्यात आली. सदर बाईक रॅलीमध्ये पोलीस स्टेशन डुग्गीपार, महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव येथील अधिकारी/अंमलदार व होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता.
सदरची अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम श्री.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.अभय डोंगरे सा. अप्पर पोलिस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, सपोनि रुपाली पवार पो.स्टे. डुग्गीपार व सपोनि राजू बस्तवाडे महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव यांनी पोलीस स्टेशन डुग्गीपार परिसरातील सडक/अर्जुनी येथे राबविली.