साप्ता.महाराष्ट्र का मानबिंदू आणि MKM NEWS 24 चा वर्धापन सोहळा केक कापून थाटात संपन्न
सडक अर्जुनी – गोंदिया येथून प्रकाशित साप्ताहिक वर्तमान पत्र महाराष्ट्र का मानबिंदू चा 11 वा वर्धापन दिवस आणि डिजिटल मिडिया MKM NEWS 24 चा 8 वा वर्धावन सोहळा दिनांक 17 ऑगस्ट रोजी सावंगी येथील हॉटेल बल ढाबा येथे केक कापून साजरा करण्यात आला.
प्रथमतः आमंत्रित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि महापुरुष यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यारपण करण्यात आले. मंचावर विराजमान अतिथी गण यांचे पुष्पगुच्छ देहूत स्वागत करण्यात आले. वर्धापन कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक चे संचालक गंगाधरजी परशुरामकर,जी. प.सदस्य निशाताई तोडासे, देवचंदजी तरोने नगरसेवक, माजी उपसभापती राजेश कठाने, सरपंच हर्ष मोदी,उपसरपंच निशांत राऊत, माजी सरपंच शेरूभाई पठाण, प्रशांत शहारे, ग्रीन पार्क चे मालक सुनीलभाऊ तरोने, हितेश डोंगरे, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच ठाणेदार गणेश वनारे, सडक अर्जुनी तालुक्यातील पत्रकार बांधव,आणि मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला संपादक डॉ.सुशील लाडे यांना पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देहून शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र का मानबिंदू चा 11 वर्षाचा प्रवास आणि MKM NEWS 24 डिजीटल मिडिया ने 8 वर्षात आता पर्यंत केलेले प्रवाशां बद्द्ल आपले मनोगत व्यक्त केले. कित्येक जनमाणसांच्या प्रश्नांना वाचा फोडत अगदी निडरतेने त्यांचे प्रश्न आपल्या लेखणी मार्फत शासन दरबारी मांडले. आणि न्याय मिळवून देण्याचे काम केले. शासन असो वा प्रशासन सर्वांच्या समोर सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याचे कामे MKM NEWS NETWORK द्वारे केले असल्याचे पाहुणे आपल्या मनोगतात बोलत होते. त्याच प्रमाणे पत्रकारिता विषयी आपले आपले विचार मंचावरील पाहुणे मंडळी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक MKM NEWS 24 चे मुख्य संपादक डॉ.सुशील यांनी केले तर संचालक बिरला गणवीर सर यांनी केले.
अंततः आभार प्रदर्शन निलेश शहारे यांनी केले. कार्यक्रम विराम झाल्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.