कॅन्सर स्क्रिनिंग व्हॅन गोंदियात 21ऑगस्ट पासून -डॉ. पुरुषोत्तम पटले जिल्हा शल्य चिकित्सक
गोंदिया: गोंदियातच मोफत कर्करोग तपासणी – २१ ऑगस्टपासून मोबाइल व्हॅन तुमच्या गावी, ग्रामीण व शहरी भागात गावोगावी मोफत स्क्रिनिंगची संधी,मुख, स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा निदानापासून उपचारापर्यंत सर्व सेवा पूर्णपणे मोफत नागरिकांनी लाभ घ्यावा. जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन कर्करोगा सारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाइल कर्करोग तपासणी व्हॅन सुरू केली आहे.
नागपूर विभागांतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी ही व्हॅन दाखल झाली असून, तिचे औपचारिक उद्घाटन २१ ऑगस्ट रोजी केटीएस जिल्हा रुग्णालयात होणार आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.
या व्हॅनद्वारे शहरासह ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) व ग्रामीण रुग्णालयांना (RH) भेट देऊन एका दिवसात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता या व्हॅनमध्ये आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजित गोल्हार यांनी सांगितली
अत्याधुनिक सुविधा:-
मोबाइल व्हॅनमध्ये एसी तपासणी कक्ष असून खालील तीन प्रकारच्या कर्करोगांची तपासणी केली जाणार आहे :
•मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर
•स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा
गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र वॅन मध्ये स्त्री रोग डॉक्टर्स कॅन्सर specialist SURGEON आणि Dentist उपलब्ध असणार आहे. निदान व मोफत उपचार प्राथमिक तपासणीत संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील निदानासाठी थेट कर्करोग रुग्णालयात पाठवले जाईल. कर्करोगाची पुष्टी झाल्यानंतर रुग्णाला शासनामार्फत पूर्णपणे मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अशी माहिती डॉ तृप्ती कटरे यांनी दिली.
“मोबाइल व्हॅनमुळे रुग्णांचा मौल्यवान वेळ वाचेल, लवकर निदान होऊन उपचार सुलभ होतील. त्यामुळे नागरिकांनी नियमित तपासणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा,” असे डॉ. सुवर्णा हुबेकर कॅम्पेन कोऑर्डिनेटर यांनी सांगितले.
जनजागृती मोहिमेचा भाग
जगभरात ४ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने राज्यात ‘कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम – २०२५’ राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोंदियामध्ये या मोबाइल व्हॅनद्वारे मोफत तपासणी मोहिमेला सुरुवात होत आहे.
नागरिकांना आवाहन – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हॅन कार्यरत राहणार असून, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.