Sunday, August 24, 2025
सड़क अर्जुनी

सौंदड येथे भव्य तान्हा पोळाचे आयोजन 

सौंदड – सौंदड येथील गांधी वॉर्ड येथे बाल तरुण गणेश उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सौंदड येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर तान्हा पोळ्यामध्ये शेकडो बाल गोपालांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि आपल्या नंदीबैलाना आकर्षक सजावट करून शेकडोच्या संख्येने उपस्थित दर्शवली होती.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकर, भगवान गणेश आणि शिवाजी महाराजांचे पूजन करून करण्यात आली सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून सौंदडचे सरपंच हर्ष मोदी, पंचायत समिती सदस्य वर्षाताई शहारे,सौंदडचे उद्योजक तथा मंडळाचे मार्गदर्शक संदीपजी मोदी,राहुल कोरे, टी.एम. चंदेवार सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

बाल गोपालांना विविध बक्षिसे आणि रोख रक्कम देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल तरुण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष लखन नेवारे, लोकेश डोंगरवार, तुकाराम डोंगरवार, मंगेश इरले, प्रदीप जांभूळकर सह असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

शेवटी सर्व उपस्थिताना प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!