ग्राहक पतसंस्था भंडाराच्या कर्मचारी भरतीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचा विरोध
•ग्राहक पतसंस्था भंडाराच्या कर्मचारी भरतीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचा विरोध
•31ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या आमसभेमध्ये सर्वांनी विरोध करा,किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया यांचे आव्हान.
गोंदिया – जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी पतसंस्था भंडारा चे अध्यक्ष तथा संचालक मंडळांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाने वारंवार विरोध करूनही संस्थेच्या शाखा उघडणे व कर्मचारी भरती करणे बाबत निर्णय घेऊन सामान्य सभासदांच्या हक्कावर पाणी फेरला आहे.
जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था भंडाराची निवडणूक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया व भंडारा या दोन्ही संघटनांनी युती करून निवडणूक लढली व भरघोस मताधिक्याने निवडून सुद्धा आले. परंतु निवडणुकीमध्ये ठरलेल्या जाहीरनाम्यानुसार किंवा सामान्य सभासदांना दिलेल्या शब्दांनुसार जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय बावनकर व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाऱ्याचे अध्यक्ष मुबारक सय्यद मी काम करीत नसल्याचे आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी केला आहे.

11 ऑगस्ट 2024 ला गोंदिया येथे झालेल्या आमसभेमध्ये वारंवार विरोध करूनही ग्राहक पतसंस्था भंडाराच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने कर्मचारी भरती व शाखा उघडण्याचा दुर्दैवी ठरवा घेतला.यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाराचे अध्यक्ष मुबारक सय्यद यांनी पाठिंबा दिल्याने गोंदिया जिल्ह्यातील सामान्य सभासदांमध्ये खूप विरोधाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्या 31 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या आमसभेमध्ये आकृतिबंधच्या ठरवला सामान्य सभासदांनी विरोध करावा,असे आव्हान किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया यांनी केले आहे.