अवैधरित्या बनावटी दारुच्या अडयावर धाड टाकुन जप्त केली लाखोंची बनावटी दारु व साहीत्य जप्त
गोंदिया – दिनांक २९/१०/२०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे कुंदन कुटीच्या मागे, वाजपेयी चौक गोंदिया येथे अवैधरित्या बनावट दारु तयार करुन जिल्यात व जिल्हयाबाहेर विक्री केली जात आहे. या खबरेवर सपोनि/वैभव गेडाम, डी.बी. पथकाचे अंमलदार व दोन पंचांना सोबत घेवुन सदर ठिकाणी गेले असता त्याठिकाणी एक ईसम अवैध्यरित्या बनावट दारु तयार करतानी दिसुन आला. पोलीस आल्याची चाहुल लागताच त्याने पळ काळण्याचा प्रयत्न केला असता त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तो बनावट दारु तयार करीत असल्याचे सांगीतले. स्टाफ व पंचा समक्ष त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पराग रमण अग्रवाल वय ३१ वर्ष, रा. स्वागत लॉन जवळ, गणेश नगर, गोंदिया असे सांगीतले. सदर ठिकाणची पंच व आरोपी समक्ष पाहणी केली असता नमुद आरोपी हा मानवी आरोग्यास व जीवीतास धोका असलेल्या स्पौरीट फ्लेवर ईत्यादी सामानाचा उपयोग करुन बनावटी दारु तयार करीत असल्याचे दिसुन आले. 
सदर ठिकाणहुन नमुद आरोपी व पंचासमक्ष बनावट दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणा-या ०१) स्पौरीट रासायनिक द्रव्य, ०२) १० रॉयल स्टंग विदेशी दारुच्या पेटया ज्यामध्ये १८० एम.एल. ने भरलेले ४८ पव्वे, ०३) ०२ नग २०० ली. क्षमतेचा स्पीरीट भरलेला प्लास्टीक ड्रम, ०४) ०२ नग ५० ली. क्षमतेचा प्लास्टीक खाली ड्रम, ०५) एका प्लास्टीक बोरीमध्ये १८० एम.एल. चे ओ.सी.ब्लु. कंपनीचे ३०० नग खाली बॉटल, ०६) एका प्लास्टीक बोरीमध्ये ओ.सी.ब्लु. व रॉयल स्टंग कंपनीचे प्लास्टीक झाकण, ०७) ड्रम मधुन स्पिरीट काढण्याची ०१ मॅन्युअल मशीन, ०८) प्लास्टीक पाईप, रॉयल स्टंग व ओ.सी.ब्लु. कंपनीचे ४० नग खाली खोके, ०९) ०५ नग पिण्याच्या पाण्याची कॅन, फ्लेवर्ड कलर, १०) ०१ हुंडाई कंपनीची वेन्यु चारचाकी वाहन, ११) ०१ विवो कंपनीचा मोबाईल व ईतर साहीत्य असा एकुण ११,०५,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करुन अप क्रं. ८९८/२०२५ कलम ६५ (अ), (ब), (क), (ड), (ई), ८३, १०८ मदाका, सहकलम १२३ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असुन आरोपीस अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोनि/किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात सपोनि/वैभव गेडाम हे करीत आहेत.
सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती. रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, सपोनि/वैभव गेडाम, श्रेणीपोउपनि/थेर, सफौ/कवलपालसिंग भाटीया, पोहवा/सतिश शेंडे, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, कमलेश राऊत, पोशि/सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, अमित पवार, विजय बिसेन यांनी केली आहे.
