Tuesday, December 9, 2025
अर्जुनी मोर

पंचायत राज संस्था व उमेद सहाय्यित विविध संस्था कृती संगम ( PRI – CBO ) प्रकल्पामुळे विकास कामात गतिशीलता निर्माण झाली – ग्रा.पं.सदस्य छगन साखरे 

अर्जुनी मोर/ महागाव – आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोज रविवारला नवजीवन प्रभाग संघ महागाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नवजीवन प्रभाग संघ महागाव येथे पी आर आय सी बीओ कृती संगम प्रकल्पांतर्गत सामुदायिक मूल्यांकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .

त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत सदस्य छगन भाऊ साखरे यांनी प्रकल्पाच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून या प्रकल्पामुळे पंचायतराज संस्था व उमेद अंतर्गत विविध संस्था यांच्यामध्ये समन्वय निर्माण होऊन विकास कामात गतिशीलता निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. त्याप्रसंगी कार्यशाळेला उपस्थित माननीय केरळ राज्याच्या मेंटोर माननीय प्रसन्ना मॅडम,नवजीवन प्रभाग संघाच्या उपाध्यक्ष माननीय रिता अरविंद मंदूरकर तसेच प्रभाग संघ सचिव हेमलता मेश्राम तसेच  महागाव ग्रामपंचायत सदस्य माननीय छगन भाऊ साखरे तसेच संपूर्ण एलआरपी प्रभाग समन्वयक मॅनेजर सी एल एफ मॅनेजर बी आर पी उपस्थित होते.

अभियानांतर्गत समुदाय आधारित संस्था ग्रामीण विकासासाठी कार्यरत विविध विभा ग यांच्यामध्ये समन्वय वाढवून दारिद्र्य निर्मूलन व महिला सक्षमीकरण तसेच महिलांच्या पंचायत राज सहभाग वाढविणे हा उद्देश प्रकल्पाच्या आहे प्रभागातील प्रभागातील ग्राम पंचायत ग्राम पंचायत स्तरावर स्थानिक संसाधन व्यक्ती एलआरपी निवड व प्रशिक्षण पंचायतराज तालुकास्तरीय कार्यशाळा गावस्तरीय सतत समृद्धी आराखडा व्हीपीआरपी विविध कार्यालय सार्वजनिक संस्था भेट गावस्तरीय विविध नागरी समित्यांचे बळकटीकरण म्हणजेच शालेय व्यवस्थापन समिती अंगणवाडी सनियंत्रण समिती गाव स्वच्छता पोषण आरोग्य व पाणीपुरवठा समीती बालसभा किशोरवयीन मुलींच्या सभा अक्षर ज्योती निरक्षर अशिक्षित महीलांना प्रौढ शिक्षण इत्यादी उपक्रम यामाध्यमातून प्रकल्प कालावधी राबविण्यात आहे.

प्रकल्प कालावधी विविध उपक्रम व गावनिहाय झालेल्या कामाचे पोस्टर प्रदर्शनी अनुभव देवाण-घेवाण विविध विभागांच्या कृती संगम योजना प्रभाग सांगा वरती भविष्यकालीन नियोजन इत्यादी बाबत सादरीकरण केले प्रकल्प अंतर्गत विविध उपक्रमामुळे वंचित घटक यांना सामाजिक न्याय व विकास प्रक्रियेतील सहभाग वाढ प्रलंबित विकास काम मार्गी लावणे ग्रामसभा उपस्थिती विकास कामांची नियोजन लोकसभा सामाजिक समस्या (दारूबंदी) दारू वेशन करणाऱ्या चार रुग्णांना वेशनमुक्ती केंद्र अंतर्गत उपचार करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यात आले विविध योजना जनजागृती व लाभ महिला व बालकल्याण निधी योग्य वापर चांगले बदल दिसून आले. सादरीकरणानंतर मार्गदर्शन करताना केरळच्या मेंटोर प्रसन्ना मॅडम यांनी झालेले बदल शाश्वत राहणे गरजेचे आहे व पुढे सतत विकास साधला पाहिजे असे अपेक्षा दर्शविली त्यावेळी उपस्थित प्रभाग संघाच्या सर्व पदाधिकारी कार्यकारणी संपूर्ण स्थानिक संसाधन व्यक्ती ग्रामपंचायत सरपंच ग्राम व सदस्य आणि लाभधारक उपस्थित होते.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रभाग संघ व्यवस्थापक जोत्सना गजभिये यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग समन्वय शिता खळे मॅडम यांनी केले त्याच प्रकारे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी आर पी आशा फुंडे मॅडम यांनी केले यांनी केले.

error: Content is protected !!