चार चाकी वाहन चोरी करणारा अट्ट्ल आरोपी पोलिसांचा जाळ्यात
गोंदिया – चार चाकी वाहन चोरी करणारा अट्ट्ल आरोपी पोलिसांचा जाळ्यात – आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेली किंमती ३,००,०००/- रुपये ची मारुती इको फाईव सिटर चारचाकी वाहण जप्त करण्यात आली आहे.
दिनांक ३०/१०/२०२५ चे २२.०० वा ते दिनांक ३१/१०/२०२५ चे ०७.०० वा . दरम्यान प्रगती कॉलनी गोंदिया येथून कोणीतरी अज्ञात चोराने मारुती इको चारचाकी वाहण किंमती ३,००,०००/- रुपये ची चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर अपराध क्रमांक ९०५ /२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .

मा. पोलीस अधिक्षक साहेब गोंदिया श्री गोरख भामरे यांचे निर्देशा प्रमाणे, व पोलीस निरीक्षक साहेब स्थानिक गुन्हे शाखा श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक हे पोलीस ठाणे गोंदिया शहर अप. क्रमांक ९०५/२०२५ कलम ३०३ (२) भान् चे गुन्हयातील चोरीस गोलेली चारचाकी वाहण व आरोपी शोधकामी गोंदिया, भंडारा, नागपुर, बेतुल परिसरात रवाना झालो होते . दिनांक ०३/११/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पथक पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीत पेट्रोलीग करीत असतांनी गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली कि पोलीस स्टेशन गोंदिया शहर अपराध क्रमांक ९०५ /२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील मारुती इको फाईव सिटर चारचाकी वाहण हे गोविंदपुर येथील इसम नामे रितीक रमेश गुप्ता व त्याचे साथीदारांनी चोरी केले आहे अशी माहीती मिळाल्याने इसम नामे रितीक रमेश गुप्ता याचा शोध घेतला असता त्यास मौजाअंभोरा येथून ताब्यात घेण्यात आले विश्ववासात घेऊन विचारपूस करण्यात आली त्यानी सांगीतले की, त्याने व त्याचे साथीदार नामे-गणेश नागदेवे रा. शास्त्री वार्ड गादिया, अमिन पठाण रा. मरारटोली गोंदिया, आशिक इंशमितं रा.छोटा गोंदिया इत्तर ३ साथिदार यांचे सोबत मिळुण दिनांक ३०/१०/१०२५ चे रात्री दरम्याण प्रगती कॉलोनी, गोंदिया येथुन एक मारुती इको चारचाकी गाडी चोरी करुन नेल्याचे सांगीतले.
सदर चोरीची गाडी कुठे आहे याचाबात विचारले असता ती गाडी तिरोडा येथील मोजा बिरसी जंगल परिसतात विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवली असल्याचे सांगतले . रितीक रमेश गुप्ता वय-२२ वर्ष रा. गोविंदपुर वार्ड, साईमंगलम् लॉन जवळ, गोंदिया याचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मारुती इको चारचाकी वाहण किंमती ३,००,०००/- रुपये ची जप्त करण्यात आली आहे.
सदरची मारुती इको चारचाकी वाहन पोलीस स्टेशन गोंदिया शहर अपराध क्रमांक ९०५ /२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता गुन्हयात चोरीस गेलेली असल्याने सदर आरोपी यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शना खाली पो.हवा. राजेंद्र मिश्रा , महेश मेहर, पोहवा. संजय चव्हाण, पोहवा. सोमेंद्रसिंह तुरकर, पोहवा भोजराज बहेकर, पो.शि. राकेश इंदुरकर पो.शि. राहुल पिंगळे, पो.शि. संतोष केदार, चापोशी. घनश्याम कुभंलवार स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया, यांनी केली आहे.
