पोलिस स्टेशन डूग्गीपार येथे 80 दात्यांनी केले रक्तदान
सडक अर्जुनी : पोलिस स्टेशन डूग्गीपार येथे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशन डूग्गीपार व डॉ.हेडगेवार रक्तपेढी सेंट्रल जिल्हा गोंदिया च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस व जागतिक हुतात्मा दिनानिमित्त पोलीस स्टेशन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ८० दात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रामुख्याने सडक अर्जुनी चे नगराध्यक्ष तेजराम मडावी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार,नगरपंचायत उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, नगरपंचायत बांधकाम सभापती आनंदकुमार अग्रवाल, नगरसेवक महेंद्र वंजारी, गोपीचंद खेडकर,नगरसेविका कामिनीताई कोवे,डुग्गीपारचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शेख, राजेश शहारे , हर्ष मोदी सरपंच सौंदड , गणेश कापगते उपसरपंच बोपाबोडी. 
तसेच इंजि. वसंत लांजेवार, डॉ.सुशील लाडे, ओमप्रकाश टेंभुर्णे, दिलीप गभणे, तेजराम चौधरी, प्रल्हाद कोरे, डॉ. मदन काटे, पोलीस पाटील सुभाष मेश्राम, मनोहर सोनवणे, सुरेश बोरकर, पुरणलाल कोडापे, युवराज पुस्तोडे, पोलीस पाटील सीमा निंबेकर, विद्या गहाणे, बिरला गणवीर, राजकुमार भगत, शाहिद पटेल, प्रभाकर भेंडारकर, ग्रामपंचायत सदस्य शुभम जनबंधू,राऊत, आधी उपस्थित होते.

वंदेमातरम, या गीताला आज १५० वर्षे पूर्ण झाल्या बद्दल यावेळी वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी डूग्गीपार पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, तसेच डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सेंट्रल हॉस्पिटल गोंदिया येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
