लोहिया विद्यालयात पक्षी सप्ताह निमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
सौंदड – लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथे सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया ,वनपरिक्षेत्र – देवरी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 10/11/2025 रोज सोमवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली व सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी सप्ताह मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून मा.ए.एम .मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी देवरी , प्राचार्या मा. उमा बाच्छल , मा. गुलाबचंद चिखलोंडे,वनरक्षक मा. एन टी मुनेश्वर, मा.व्ही. के .गौतम ,पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे ,प्राध्यापक आर. एन .अग्रवाल उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांनी विद्यार्थ्यांना पक्ष्यांचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे हे समजावून दिले .
मार्गदर्शक मा . वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम ,वनरक्षक मा.मुनेश्वर , मा.गौतम यांनी पक्षी व वन्यजीवांच्या संरक्षणासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले .विद्यालयाच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हरित सेनेचे महत्त्व समजावून दिले .यावेळी विद्यालयातील वर्ग 9 मधील यस्मित. बडोले , शाक्य सातकर व कुमारी सलोनी लांजेवार यांनीही पक्ष्यांविषयी उत्कृष्ट माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स.शि.यू.बी.डोये यांनी केले तर आभार स.शि. एस.पी . मांडारकर यांनी मानले.
