काळ बदलला तरी पालकांची माया विसरू नका – प्रशांत शहारे -भाजपा जिल्हा महामंत्री
सडक अर्जुनी – मौजा डव्वा येथे मंडई उत्सवाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या ‘बाळा मीच तुझी आई रे’ या अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रभावी नाट्यप्रयोगाला ग्रामस्थ व कलाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील पालकांप्रती कृतज्ञता, मातृत्वाचे महत्व आणि बदलत्या काळातही नातेसंबंधांची जपणूक करण्याचा संदेश या नाट्यप्रयोगातून परिणामकारकरित्या मांडण्यात आला. 
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, पंचायत समिती माजी उपसभापती व सदस्य शालिंदरजी कापगते, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष छायाताई चौहान, युवा मोर्चा प्रदेश सदस्य हितेशजी डोंगरे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून कलाकारांचे व आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत शहारे, भाजपा जिल्हा महामंत्री (गोंदिया) यांनी म्हटले—
“काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, पण आपल्या पालकांची माया, त्याग आणि प्रेम कधीही बदलत नाही. तरुणांनी आई-वडिलांची उतारवयात मनापासून, प्रेमाने आणि जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे. हे आपले कर्तव्यच नव्हे तर संस्कार आहेत.” त्यांच्या या भावनिक आवाहनाने उपस्थितांचे मन हेलावून गेले. 
कार्यक्रमास ग्रा.पं. डव्वा सरपंच योगेश्वरीताई चौधरी, ग्रा.पं. पाटेकुरा सरपंच प्रशांतजी बालसनवार, तसेच दिनेशजी कोरे, पुष्पमालाताई बडोले, अनिलजी बिलिया, विवेकजी राऊत, लोकेशजी कुरसुंगे, रमेशजी मेंढे, नरेशजी प्रधान, एकनाथजी गायधने, हंसराजजी राऊत, चेतनजी नागपुरे, विलासजी चौहान, सुनीलजी घासले, शारदाताई किरसान, लताताई राऊत, मंगलाताई कुरसुंगे, मोरेश्वरजी वाघाडे, महेंद्रजी राऊत, सुधाकरजी ब्राह्मणकर, राकेशजी जैन, चुनिलालजी कुरसुंगे, मेघनाथजी उंदीरवाडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने युवक-युवती आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नाट्यप्रयोगाच्या प्रभावी सादरीकरणामुळे भावनिक वातावरण तयार झाले. ग्रामस्थांनी अशा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी गावातील एकात्मता वाढते आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो, असे सांगत आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले.
