Tuesday, December 9, 2025
सड़क अर्जुनी

लोहिया विद्यालयात बालक दीन साजरा

सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमूनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 नोव्हेंबर 2025 रोज शुक्रवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात पंडित जवाहर नेहरू यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य मा. उमा बाच्छल,मा.गुलाबचंद चिखलोंडे , मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे ,ॲड. मा. रीता राऊत , योगेश थोटे, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे , प्राध्यापक मा .आर. एन. अग्रवाल,आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की आजचे बालक हे उद्याचे भविष्य असल्यामुळे ते संस्कारी होणे गरजेचे आहे. ॲड.रीता राऊत , योगेश थोटे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित कायद्यांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या प्राचार्या बाच्छल मॅडम, चिखलोंडे सर , प्राध्यापिका पी.एस. भेंडारकर यांनी पंडित जवरलाल नेहरु यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बालक दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीत व भाषणाच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली.

कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन स.शि. यू . बी.डोये यांनी केले तर आभार स. शि. आर.आर. मोहतुरे यांनी मानले.

error: Content is protected !!