“विर बिरसा मुंडांच्या आदर्शावर विज्ञानवादी समाज घडवूया” — छगनभाऊ साखरे
जय सेवा आदिवासी समाज संघटना, महागावतर्फे बिरसा मुंडा जयंती उत्साहात
महागाव : जय सेवा आदिवासी समाज संघटना, महागाव यांच्या वतीने बिरसा मुंडा जयंती उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. “विर बिरसा मुंडांच्या विचारातून विज्ञानवादी समाज निर्माण करण्याची गरज आहे,” असे मत महागावचे ग्रामपंचायत सदस्य छगनभाऊ साखरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता ज्योत प्रज्वलन व ध्वजारोहणाने झाली. सकाळी ९.०० वाजता बिरसा मुंडा गौरव रॅली काढण्यात आली. दुपारी १.०० वाजता स्वागत समारंभास सुरुवात झाली.
सूत्रसंचालन मनोहरजी बडवाईक यांनी केले तर प्रास्ताविक कैलास वरकडे यांनी सादर केले.
दुपारच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जयश्रीताई देशमुख (जि. प. सदस्य, महागाव) होत्या. उपाध्यक्ष म्हणून मा. छगनभाऊ साखरे (ग्रा. पं. सदस्य, महागाव) उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रमोदजी लांडगे (पं. स. अर्जुनी मोरगाव), मा. भुवनजी मिश्रा महाराज (महागाव), मा. रुपचंदजी खोब्रागडे (माजी सरपंच, शिरोली), मा. पिंटुभाऊ रामटेके (महागाव), मा. गोपीचंद पुराम (माजी सरपंच, शिरोली), मा. मधुकरजी ताळाम (शिरोली) तसेच मा. स्वप्नील ता. उके (लोकमत वार्ताहर, महागाव) उपस्थित होते.
मान्यवरांनी बिरसा मुंडांच्या संघर्षमय कार्याची आठवण करून देत आदिवासी समाजात एकजूट, प्रगतिशीलता व विज्ञानवादी दृष्टिकोनाची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. ममता कैलास वरकडे यांनी केले.
