Tuesday, December 9, 2025
सड़क अर्जुनी

“गावातील दडलेली कला उलगडत राहिली पाहिजे — प्रशांत शहारे

मौजा दोडके-जांभळी येथे ‘एक डाव वाघिणीचा’ नाटकाचे भव्य आयोजन

डव्वा/सडक अर्जुनी – मौजा दोडके-जांभळी येथे गावकऱ्यांच्या पुढाकारातून ‘एक डाव वाघिणीचा’ या सामाजिक आणि प्रबोधनपर नाटकाचे भव्य आयोजन करण्यात आले. ग्रामीण संस्कृती, वास्तव आणि स्त्रीशक्तीवर आधारित या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करताना प्रशांत शहारे (जिल्हा महामंत्री भाजप गोंदिया)यांनी “गावातील दडलेली कला उलगडत राहिली पाहिजे” असे मत व्यक्त केले.

त्यांनी पुढे सांगितले की,

“गावामध्ये अफाट कला आणि प्रतिभा दडलेली असते. योग्य व्यासपीठ मिळाले तर ही कला समाजासाठी प्रेरणादायी ठरू शकते. अशा नाट्यप्रयोगांमुळे गावातील तरुणाईला नवचैतन्य मिळते.”

या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

प्रमुख मान्यवरांमध्ये —जिल्हा परिषद सदस्य डॉ. भूमेश्वरजी पटले,माजी उपसभापती तथा सदस्य शालिंदरजी कापगते,ग्रा.पं. दोडके-जांभळी सरपंच रंजिताताई कोरामयांच्यासह धर्मराजजी भलावी, रेखाताई मरस्कोल्हे, विजयजी सोनवाणे, टिकारामजी कावळे, भरतजी कडीनहके, शेखरजी कुरसुंगे, हरिभाऊ येरने, शेवकजी वाघाडे, विनोदजी कावळे, चंद्रशेखरजी खरवडे, बोपचंदजी उइके, प्रतिमाताई कोडवते, सोहमजी मलगाम, अशोकजी इलपाते, सुमितजी उइके, देवरामजी भलावी, मेघराजजी किरसान, देवरामजी मंडारे, झालुजी शिरसाम, रविजी कोराम, प्रल्हादजी कडीनाहाके, दुर्गेसजी टेकाम, अतुलजी टेकाम, नूतनजी मंडारे, संतोषजी टेकाम, संतोषजी चौधरी, कृष्णकांतजी मरस्कोल्हे, निरूपाताई टेकाम आदी मान्यवर उपस्थित होते.

नाटकातील कलाकारांनी मांडलेला सामाजिक संदेश, स्त्रीशक्तीचे दर्शन आणि ग्रामीण जीवनातील संघर्षाचे प्रभावी चित्रण याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण गावाने एकदिलाने केलेला सहयोग, कलाकारांचा उत्साह आणि प्रेक्षकांची उपस्थिती यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

गावातील सांस्कृतिक परंपरेला नवे आयुष्य देणारा आणि कलावंतांना प्रेरणा देणारा हा नाट्यप्रयोग गावकऱ्यांच्या एकजुटीचा उत्तम नमुना ठरला.

error: Content is protected !!