पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिवस शपथेचे आयोजन
गोंदिया – सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते इंदिरा गांधी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया श्री रामदास शेवते तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ हे मोठया संख्येने उपस्थित होते.
