Tuesday, December 9, 2025
अर्जुनी मोर

सदाशिव अवगान वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुवर्णपदक

अर्जुनी-मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे ) – देहरादून येथे दिनांक १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या २८ वी ॲाल इंडिया फॅारेस्ट स्पोर्ट्स मिट २०२५ मध्ये भारतातील ३६ राज्यांनी विविध स्पर्धेत भाग घेतला, महाराष्ट्राकडून ५० वर्षावरील गटात सदाशिव अवगान, वनपरिक्षेत्र अधिकारी नवेगाव बांध (प्रादेशिक) यांनी सायकल स्पर्धेत महाराष्ट्राकडून निवड करण्यात आली होती.

देहरादून येथे दिनांक १३ नोव्हेंबर ला झालेल्या ४० कीमी सायकल स्पर्धेत १ तास २८ मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला, आणि महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक खेचून आणले. तसेच मंगला खोब्रागडे वनरक्षक बाराभाटी यांना महीला ओपण गटात २५ की.मी. सायकल स्पर्धेत रौप्यपदक मिळवून महाराष्ट्राची शान वाढवली, या स्पर्धेसाठी गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक पवणकूमार जोंग, प्रकाष्ठ निस्कासन अधिकारी अविनाश मेश्राम,तथा वनविभागातील सर्व अधिकारी,कर्मचारीवृंद व मित्रपरिवार यांनी अवगान साहेबांना प्रोत्साहित करून त्यांचे मनोधैर्य वाढवून, कौतुक केले आहे.

error: Content is protected !!