ग्रामपंचायत पाटेकुर्रा येथे २०० महिलांनी केली ॲनिमियाची तपासणी
सडक अर्जुनी – दिनांक २४/११/२०२५ रोजी ग्रामपंचायत पाटेकुर्रा येथे माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत ग्राम पाटेकुर्रा व प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा तर्फे ॲनिमिया तपासणी शिबिर ठेवण्यात आलेला होता. या शिबिर मध्ये २०० च्या वरून महिलांनी आपली तपासणी करून घेतली.
यावेळी प्रामुख्याने सरपंच प्रशांत बालसनवार, उपसरपंच विश्वनाथ टेकाम, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कापगते, ग्रामपंचायत सदस्य नरेश कटरे,रविकुमार भलावी, शीला कवरे, आशा येळे, सीमा सराटे, फुलवंता गावळ,तसेच कावळे साहेब प्राथ.आरोग्य केंद्र डव्वा, वासनिक मॅडम, ध्रुपता पारधी , सुनीता कटरे, डॉ.महेंद्र येळे,राकेश मेश्राम, गणू कृष्णा, निखिल पारधी,आकाश कवरे, समिर कवरे व सचिन हाय स्कूल चे सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
