Thursday, December 11, 2025
सड़क अर्जुनी

नगरपंचायत सडक अर्जुनी ला संताजी जगनाडे महाराज जयंती चा विसर

सडक अर्जुनी – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत थोर राष्ट्र पुरुष / संत महापुरुष ,थोर व्यक्ती जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेला आहे.

परिपत्रका नुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात थोर पुरुषांच्या जयंती साजरी करणे आवश्यक आहे. मात्र शासकीय परिपत्रक नुसार नगरपंचायत कार्यालय सडक अर्जुनी येथे दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचा विसर पडला होता. सांगायचे म्हणजे ८ डिसेंबर २०२५ रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली.

परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जी पना मुळे सडक अर्जुनी नगर पंचायत कार्यालयात संताजी जगनाडे महाराज यांची जयंती करण्यात आली नाही. या कारणाने सडक अर्जुनी शहरातील तेली समाज बांधव नाराजी व्यक्त करीत आज दिनांक १० डिसेंबर २०२५ सदर अधिकान्यावर योग्य ती चौकशी करुन तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे निवेदन  जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या नावे निवेदन देत प्रतिलिपी नगरपंचायत सडक अर्जुनी चे अधिकारी वाघमारे यांना दिले.

निवेदन देताना तेली समाज बांधव
निवेदन देताना तेली समाज बांधव

दिलेल्या निवेदना नुसार,

संदर्भ 1- शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. GAD-49022/65/2024-GAD (DESK-29) कि.

२७/१२/२०२४ चे परिशिष्ट सन २०२५ मध्ये मंत्रालय, शासकीय/निमशासकीय कार्यालयात साजरी करावयाचा जयंती आणि राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादीनुसार.

२) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क. जपुती-२२०८/१३३८/प्र.क्र.१०९/०८/२९.वि.

२४/११/२००८ मधील सुचनांनुसार विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी कार्यवाही करावी. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सविनय विनंती आहे की, नगरपंचायत कार्यालय सडक अर्जुनी येथे दि. ८ डिसेंबर २०२५ ला श्री संत संताजी जगनाडे यांची असुन नगरपंचायत कार्यालयामध्ये संदर्भिय विषयानुसार जयंती साजरी करणे अनिवार्य असुन संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचारी व पदाधिकारी यांना कसल्याही प्रकारची पुर्वसुचना दिली गेली नाही आणि नगरपंचायत कार्यालयात जयंती सुध्दा साजरी करण्यात आलेली नाही. यावरून असे दिसुन येते की, शासनाने

दिलेल्या आदेशाचे उल्लंघन संबंधित अधिकाऱ्याने केलेले आहे. करीता सदर अधिकान्यावर योग्य ती चौकशी करुन तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी दिलेल्या निवेदना नुसार केल्या गेली आहे.

error: Content is protected !!