AMNSP द्वारे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस साजरा
संभाजीनगर – – आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायक सुरक्षा परिषद तर्फे आज दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आला. संघटनेतर्फे विविध क्षेत्रात समाज कार्य करणाऱ्या श्री.राजू जैस्वाल, समाजसेवक, घाटी हॉस्पिटल व विविध हॉस्पिटल, श्री.मोहिद हशर, जमील बेग मस्जिद दररोज 2200 रुग्णांना अन्नदान विविध हॉस्पिटल, घाटी हॉस्पिटल, श्री.सय्यद म्हसयुद्दीन, ग्लोबल फाउंडेशन फ्री डायलेसिस फ्री एम.आर.आय, श्रीमती खाजा कौसर, शिक्षण तज्ञ , श्री.शेख जावेद, रक्त उपलब्धता 24 तास, श्री.शेख शेरू भाई समाजसेवक कॅन्सर हॉस्पिटल, श्री.रियाज देशमुख, निपक्ष पत्रकारिता व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. 
सदर कार्यक्रम हा श्री. हौसिला प्रसाद दुबेजी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री कुलदीप सिंह जी राष्ट्रीय कोषाध्यक्ष, यांच्या सहयोगाने आणि शेख रशीद रहिमान राष्ट्रीय महासचिव यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला , सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर बोरगावकर प्रदेश महासचिव, रुकय्या बेग महिला प्रदेशाध्यक्ष, खान येहतेश्याम जिल्हाध्यक्ष, भगवान खेडकर जिल्हा सचिव, सय्यद मोबीनुद्दीन शहराध्यक्ष. या सर्वांनी परिश्रम घेतले.
