मुस्लिम अल्पसंख्यांक विषयक जनजागृती सभा

सडक अर्जुनी – मुस्लिम अल्पसंख्याक विषय असलेल्या विविध योजनेच्या अनुषंगाने सडक अर्जुनी येथे १६ डिसेंबर २०२५ ला सभा घेण्यात आली. प्रथम महा मायनॉरिटी एनजीओ फोरमचे अध्यक्ष जाकीर शिकलगार व कार्याध्यक्ष डॉ. प्रा. असलम बारी याचे सडक अर्जुनी शहरात प्रथम आगमन झाल्याने समाजबांधवांच्या वतीने पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जाकीर शिकलगार व डॉ. प्रा. असलम बारी यांनी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या विविध योजने विषयी विस्तृत माहिती दिली. तसेच शासनाने अल्पसंख्यांक विभाग सुरु केले.
परंतु, अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. जिल्हास्तरावर कार्यालयात अल्पसंख्यांक विभागाची पाटी लावून प्रत्यक्षात अल्पसंख्यांकांच्या असलेल्या गरजा, समस्या याविषयी कार्यवाही करून निराकरण होणे जरुरी आहे असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.
सभेला मो. युसूफ पटेल, ईद्रीसभाई मेमन,मजितभाई, युनूस पटेल,समिन शेख, इशराईलभाई कुरैशी, असफाक छवारे, आशिकभाई शेख, मो.जुबेर यासिनी तसेच मानबिंदू चे संस्थापक संपादक डॉ. सुशिल लाडे, पत्रकार आर. व्ही. मेश्राम आदी उपस्थित होते.सभेचे संचालन आशिफभाई पटेल यांनी केले तर आभार शाहिद पटेल यांनी मानले.सभेला समाजबांधव जेष्ठ नागरिक व युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
