नवनिर्मित ग्रामपंचायत इमारत विकासाचा केंद्रबिंदू ठरावी : आमदार राजकुमार बडोले
अर्जुनी मोरगाव — ग्रामपंचायत ही गावविकासाची पायाभूत संस्था असून केंद्र व राज्य शासनाचा थेट निधी ग्रामपंचायतीमार्फत गावांच्या विकासासाठी उपलब्ध होतो. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घ्यावा. या उपक्रमांमधून मिळणाऱ्या बक्षिसांच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन राजकुमार बडोले यांनी केले.

ते अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत येगाव येथील नवनिर्मित ग्रामपंचायत भवन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी, २२ डिसेंबर रोजी उद्घाटक म्हणून बोलत होते. गावातील आवश्यक विकासकामांसाठी आमदार म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या जयश्री देशमुख, पंचायत समिती सदस्या भाग्यश्री सयाम व होमराज पुस्तोळे उपस्थित होते. याशिवाय सरपंच आनंदराव सोनवाणे, उपसरपंच अनुताई शिवणकर, ग्रामपंचायत अधिकारी कुमारी एस. एल. कावळे, ग्रामपंचायत सदस्य सर्वस्वी राजकुमार खोब्रागडे, कौशल्या नेवारे, आम्रपाली तिरपुडे, सविता सोनवाणे, काशिनाथ शहारे, पोलीस पाटील मुकुंदा तिरपुडे तसेच जानव्याचे सरपंच किशोर ब्राह्मणकर, उपसरपंच आम्रपाली बारसागडे यांच्यासह आडकू भेंडारकर, कल्पना फुंडे, निप्पल बरैया, चेतन ब्राह्मणकर, महेश कोरे व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले.संचालन व आभार मुख्याध्यापक केशव कोल्हे यांनी केले
