खोडशिवनी येथे मुरमाची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
सडक अर्जुनी – मुरमाची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर सडक अर्जुनी येथील महसूल विभागाने जप्त केले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता. १६) खोडशिवनी येथे केली. टक्टर मालक विठोबा पुस्तोडे व गणपत परशुरामकर (दोघेही रा. खोडशिवनी) यांचे ट्रॅक्टर खोडशिवनी येथून विनापरवाना मुरूम वाहतूक करताना पकडण्यात आले. दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ही कारवाई ग्राममहसूल अधिकारी श्रीमंत मौदेकर, रहांगडाले, कुरेशी, हर्ष उईके व तहसीलच्या पथकाने केली.

