Tuesday, January 27, 2026
सड़क अर्जुनी

लोहिया विद्यालयात वसंतपंचमी, संत तुकाराम महाराज,नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

सौंदड : – येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य . व उच्च माध्य.विद्यालय,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदड येथे दि.23 जानेवारी 2026 रोज शुक्रवारला विद्यालयात संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली वसंत पंचमी,संत तुकाराम महाराज , सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी लो.शि .सचिव मा.पंकज लोहिया,विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल, प्राचार्य मा.गुलाबचंद चिखलोंडे ,मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे, पर्यवेक्षिका मा.सौ.कल्पना काळे , प्राध्यापक मा.आर .एन. अग्रवाल , आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी वसंत पंचमीच्या पर्वावर सरस्वती मातेच्या मंदिरातील प्रतिमेचे, संत तुकाराम महाराज,नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळा साहेब ठाकरे यांच्या प्रतिमाचे पुजन करून माल्यार्पण केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदयांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीत टीव्ही आणि मोबाईल पासून दूर राहून अभ्यासात जास्त लक्ष केंद्रित करून आपले ध्येय गाठावे . विद्यालयाच्या प्राचार्यांनी म्हटले की विद्यार्थ्यांनी बहादुरी, इमानदारी व जबाबदारीने आपले कार्य पूर्ण करावे. यावेळी वर्ग 10 E च्या विद्यार्थिनींनी मा सरस्वतीची वंदना गायली,डी.एल.एड. ची केतकी बोरकर व वर्ग 6 वी ची कृपा ठाकरे या विद्यार्थिनींनी त्यांच्या जीवन चरित्राची माहिती सांगितली.

कार्यक्रमाला शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन स. शि.यू .बी. डोये यांनी केले तर आभार आर. आर. मोहतुरे यांनी मानले.

error: Content is protected !!