तालुका स्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रम डोंगरगाव येथे संपन्न
सडक अर्जुनी – तालुक्यातील डोंगरगाव येथे आज दि. २० फेब्रुवारी रोजी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, जिल्हा परिषद गोंदिया पंचायत समिती सडक अर्जुनी द्वारे आज तालुका स्तरावर भव्य पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजकुमार बडोले होते.तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, दिपा चंद्रीकापुरे सभापती, जी.प . सदस्य डॉ.भूमेश्वर पटले, चेतन वळगाये सभापती, कविता रंगारी सदस्या जी. प., निशा काशिवार उपसभापती, डॉ. रुखीराम वाढई ,शालिंदर कापगते,संगीता खोब्रागडे, सरपंच पौर्णिमा गणवीर, अल्लाउद्दीन राजानी, दीपाली मेश्राम, सपना नाईक, वर्षा शहारे, डॉ.गुणवंत भडके, डॉ.श्रीकांत वाघाये , आणि इतर पशु वैद्यकीय डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, स्थानिक शेतकरी, पशुपालक, गोपालक आणि पक्षीपालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

यावेळी विविध जातींच्या दुधाळ जनावरांचे (गायी, म्हशी), शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालन आणि इतर पक्ष्यांचे दर्जेदार नमुने प्रदर्शित करण्यात आले. पशुपालकांना आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, चारा व्यवस्थापन, रोगप्रतिबंधक उपाय, कृत्रिम रेतन, दुग्ध उत्पादन वाढीचे नवीन मार्ग आणि पक्षीपालनातील उन्नत पद्धती याबाबत तज्ज्ञ अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रदर्शनात शेकडो पशुपालकांनी आपल्या जनावरांचे आणि पक्ष्यांचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट जनावरांना आणि पक्ष्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती, अनुदान, शेळी/कुक्कुट गट वाटप आणि इतर लाभ याबाबत सविस्तर चर्चा झाली व पशु पालकांना विविध बक्षिक देण्यात आले. पशुपालकांना या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या व्यवसायात सुधारणा होण्यास मदत झाली.

पदाधिकारी म्हणाले की, “अशा तालुका स्तरावरील प्रदर्शनांमुळे पशुपालकांना एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळते आणि दुग्ध, मांस, अंडी उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. शासनाच्या विविध माध्यमातून मंजूर योजनां अंतर्गत हे आयोजन केले जाते.”
कार्यक्रमाला स्थानिक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, /प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी , नागरिक , पत्रकार उपस्थित होते.
