सडक-अर्जुनी: महसूल विभागाची रेती तस्करांवर कठोर कारवाई; ट्रॅक्टर जप्त, लाखोंचा दंड
सडक अर्जुनी- २५/२/२६ – तालुक्यातून अवैध रित्या मोठ्या प्रमाणात रेती चोरी वाढली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि चोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने पिंपरी, खोडशिवणी, गिरोला परिसरात आणि इतर घाटांमध्ये सक्रिय रेती तस्करांवर धडक कारवाई करत अनेक ट्रॅक्टर जप्त केले आणि लाखोंचा दंड आकारला.

दिनांक 20/02/2026 ला अवैध गौण खनिज वाहतुक थांबविण्याचे अनुषंगाने तहसिल कार्यालया मार्फत सडक अर्जुनी तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यवाही अंतर्गत नायब तहसिलदार जगदीश जांभुळकर यांचे मार्फत मौजा डोंगरगाव येथे दोन वाहन ट्रक्टर वर कार्यवाही करण्यात आले. सदर वाहन नरेश महादेव शेंडे रा. डोंगरगाव ट्रक्टर विना क्रमांक व टिंकु शेंडे रा. डोंगरगाव ट्रक्टर विना क्रमांक यांचे मालकीचे असून त्यापासुन अंदाजे रू. 246000/- चे दंडाचे कार्यवाही करण्यात येईल. तसेच दिनांक 20/02/2026 प्रेरणा कटरे तहसिलदार सडक अर्जुनी यांचे मार्फत मौजा पिपरी येथे तीन वाहन ट्रक्टर यांचेवर कार्यवाही करण्यात आले. सदर वाहन हे अमोल ग्यानीराम घरत ट्रक्टर क्र. MH36 AG8856, भरतराम दवनाजी कोरे ट्रक्टर क्र. MH35 AR8678, माधुरी दिनेश कोरे ट्रक्टर क्र. MH36 AR9102 यांचे मालकीचे असून त्यापासुन अंदाजे रू. 3,69,000/- चे दंडाचे कार्यवाही करण्यात येईल. तसेच दिनांक 24/02/2026 ला हनुमंत आंबेकर व राजेश भुरे ग्राम महसुल अधिकारी यांचे मार्फत मौजा खेडशिवणी ते गिरोला रोड येथे एक वाहन ट्रक्टर विनाक्रमांक यांचेवर कार्यवाही करण्यात आले. सदर वाहन हे राजु परशुरामकर यांचे मालकीचे असुन त्यापासुन अंदाजे 1,23,000/- चे दंडाचे कार्यवाही करण्यात येईल.



ही कारवाई रेती माफियांच्या मनसुब्यांवर पाणी फेरणारी ठरली असून, येत्या काळात अजून मोठ्या प्रमाणात कारवाया होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सर्वांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
