Thursday, February 26, 2026
सड़क अर्जुनीदुर्घटना

चिखली येथे भीषण अपघात; एक युवक जागीच ठार, एक गंभीर जखमी 

चिखली (सडक अर्जुनी) २५ फेब्रुवारी २०२६ — गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे आज दिनांक २५ फेब्रुवारी रात्री अंदाजे ७ ते ८ वाजे चे सुमारास  झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात एक युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पोलिस सुत्राद्वारे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,

रस्त्यावर उभ्या ट्रकला मागून दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. ही घटना ब्रम्हपुरी वडसा राज्यमार्गावर चिखली जवळ सायंकाळी सात ते आठ च्या सुमारास घडली. मृतकाचे नाव हेमराज पांडुरंग हेमने वय वर्षे 40 असून महारु ब्राह्मणकर असे जखमी चे नाव आहे दोघेही चिखली येथे रहिवासी आहेत . माहितीनुसार मृतक हेमराज हेमने व महारु मानकर हे दोघेही दुचाकी (क्रमांक एम एच 35 ए.टी. 3325 ) ने कोकणा कडून चिखली आपल्या सहगावी वापस येत होते .

दरम्यान चिखली जवळ रस्त्यावर उभे असलेला ट्रक क्रमांक ( एम. एच. 40 बी.जी. 3742) ला मागून जोरदार धडक दिली त्यात हेमराज रहेले जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल केले. व घटनेची माहिती डूग्गीपार पोलिसांना दिली. डूग्गीपार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.

कित्येकदा रात्रीला ट्रक चालक ट्रॅक रस्त्यावर उभे केले असता इंडिकेटर सुरू करीत नाही. ज्यामुळे वाहन चालकाला अपघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणांत होत असते. चिखली येथे झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!