M.M.M.S.परीक्षेत जि. प.शाळा, मोरगाव शाळेचे घवघवीत यश
अर्जुनी मोरगाव – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत २०२५-२६ ला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.)विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथील १३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सदर शालेय विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सण २००८-०९ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.)परीक्षा ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जाते.आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे या हेतूने दरमहा रु.१०००/-(वार्षिक-१२,०००/-) शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते.इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकांतील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे अशा पालकाच्या पाल्याना गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्ती देण्यात येते. 
जि. प.वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथील शिक्षकवृंदानी अतिरिक्त सराव वर्ग घेऊन, विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. मागील ६ वर्षांपासून सदर शाळेतील विद्यार्थी एन .एम. एम. एस.परीक्षेत उत्तीर्ण होऊन, गुणवत्ता यादीत स्थान मिळवीत आहे.
मागील काळात”आमची शाळा-आदर्श शाळा” या जिल्हा परिषद व अदानी फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवित येणाऱ्या उपक्रमात सदर शाळेने तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविले होते तसेच मागील शैक्षणिक सत्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -२ यामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक चे ११ लक्ष रुपयाचे पारितोषिक पटकावून, सदर शाळेने जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला. त्याची परिणीती म्हणून आज १२ ते १५ किलोमीटर लांब अंतरावरून शालेय विद्यार्थीने सदर शाळेत अध्ययनासाठी प्रवेश मिळविला.
सदर परीक्षेत रुचिता सुहास शहारे,लावण्या देवदास पर्वते, आलिया मुनेश्वर शहारे, प्राची जयदास ठाकरे, तेजस कमलेश कऱ्हाडे, अनुज सुनिल दर्रो, आष्का तनंजय शहारे ,ग्रेसी भोजराज लाडे, आचल अज्ञान हातझाडे,देविका मुकेश नवरंग,यशश्री संजय राऊत,श्रावणी अजय लाडे, ललित गोपीचंद मंदूरकरआदींनी यश संपादन केले.
सदर विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी जनार्धन राऊत,गटसमनव्यक सत्यवान शहारे,श मुख्याध्यापक सु.मो.भैसारे,विषयशिक्षक पुरुषोत्तम गहाणे,वर्गशिक्षिका रुपाली मेश्राम, जितेंद्र ठवकर,रेवानंद उईके, वामन घरतकर, अचला कापगते-झोळे ,स्वयंसेवक रुषेश्वर मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी लोदी, सरपंच गीता नेवारे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनूताई कराडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे ,पोलीस पाटील रमेश झोडे आदींनीअभिनंदन करून ,उज्ज्वल भविष्याच्या कामना केली.
