Saturday, February 28, 2026
अर्जुनी मोर

स्वदेशी उद्योगांना चालना देणारे ‘इंडियन ईकार्ट’ अॅप सुरू

अर्जुनी मोरगाव : शिवजयंतीच्या पावन पर्वावर आधुनिक व्यापार व्यवस्थेला चालना देणाऱ्या ‘इंडियन ईकार्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे भव्य लोकार्पण आ. नाना पटोले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक व्यवसायाला डिजिटल जोड देत व्यापारी, उद्योजक आणि ग्राहक यांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पारदर्शक व्यवहार व विश्वासार्ह सेवा देणे हा ‘इंडियन ईकार्ट’चा मुख्य हेतू आहे.

कार्यक्रमात बोलताना आ. नाना पटोले म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना साकारली. त्यांच्या प्रेरणेने स्वदेशी उद्योगांना बळ देण्यासाठी अशा डिजिटल उपक्रमांची गरज आहे. स्थानिक उद्योजकांनी डिजिटल माध्यमांचा स्वीकार केल्यास आर्थिक विकासाला गती मिळेल.” त्यांनी या अॅपच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील व्यापाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.

Oplus_131072

‘इंडियन ईकार्ट’चे संचालक कुलदीप राठोड यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग सेवा, डिजिटल मार्केटप्लेस, गव्हर्नमेंट मटेरियल सप्लायर, जीएसटी पोर्टल सेवा, ट्रान्सपोर्टेशन व लॉजिस्टिक्स सेवा यांचा समावेश करण्यात आला आहे. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह सेवा ही या अॅपची वैशिष्ट्ये आहेत. लवकरच मोबाइल अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार असून www.indianecart.in� या संकेतस्थळावर नोंदणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अॅपचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांनी या नव्या डिजिटल उपक्रमाचे स्वागत करत स्थानिक व्यापार क्षेत्रासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

error: Content is protected !!