Sunday, March 1, 2026
सड़क अर्जुनी

गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये उत्साहपूर्ण विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

MKM NEWS 24 – डॉ.सुशील लाडे 

सडक-अर्जुनी (गोंदिया) : गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूल न्यू डेजी इंग्लिश प्रायमरी स्कूल सडक अर्जुनी येथे आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा चे अध्यक्ष संस्थापक शेषराव गिऱ्हेपुंजे, प्रमुख पाहुणे म्हणून रोशनी गिऱ्हेपुंजे, मयुरी येरणे, वैशाली गिऱ्हेपुंजे मॅडम, डॉ. सुशिल लाडे, प्रिन्सिपॉल नितीन चेरियन, संजय डोये, शाळेचे शिक्षक, कर्मचारी,पालक वर्ग उपस्थित होते.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता आणि सर्जनशीलता वाढली असून, शालेय विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि प्रकल्प सादर केले.

या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, रोबोटिक्स, पाणी शुद्धीकरण, सौरऊर्जा यंत्रणा, मानवी शरीररचना, रसायनशास्त्रातील प्रयोग आणि इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित अनेक आकर्षक मॉडेल्स तयार केले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक, शिक्षक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी सांगितले की, “अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर व्यावहारिक अनुभव मिळतो. हे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला बळकटी देतं.”

काही उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’, ‘वॉटर प्युरिफायर फ्रॉम नॅचरल मटेरियल्स’, ‘सोलर पावर्ड चार्जिंग स्टेशन’ आणि ‘ह्यूमन अॅनाटॉमी मॉडेल’ यांचा समावेश होता. या मॉडेल्सनी पाहुण्यांचे आणि पालकांचे विशेष लक्ष वेधले.

प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट प्रकल्पांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होत असून, भविष्यात ते मोठे शास्त्रज्ञ आणि संशोधक बनू शकतील.

ही विज्ञान प्रदर्शनी शाळेच्या वार्षिक उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा भाग असून, यापूर्वीही शाळेत गणित प्रदर्शनी, वार्षिक स्नेहसंमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहेत.

गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूल सडक-अर्जुनी येथील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि मेहनतीला सलाम!

error: Content is protected !!