सडक अर्जुनी तालुक्यात काही ठिकाणी सिमेंट विटांच्या भट्ट्या थेट गावांमध्येच
सडक अर्जुनी- सडक अर्जुनी तालुक्यातील काही ठिकाणी सिमेंट विटांच्या भट्ट्या थेट गावांमध्ये तालुक्यातील किंवा जवळपास चालवल्या जात असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. सिमेंट भट्ट्या मालकांनी स्थानिक ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालयची परवानगी घेतली काय? आणि घेतली असेलही तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि तहसील कार्यालयाने थेट गावामध्येच परवानगी (NOC) देऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले नाही काय? त्यांना नागरिकांच्या आरोग्याची खेळण्याचा परवाना दिला कोणी??.. 
कित्यके सिमेंट भट्ट्या मध्ये अवैध प्रकारे वाळू चा उपयोग केला जातो. संबंधित विभाग ह्या विट भट्ट्या वर भेटी देतात काय .?
या भट्ट्यांमधून निघणारा मोठ्या प्रमाणातील सिमेंटचे सूक्ष्म कण , (धूर) हवेत मिसळतात, ज्यामुळे श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होतात. मुख्य समस्या आणि आरोग्य धोके श्वसन विकार: दमा, खोकला, घसादाह, फुफ्फुसातील जळजळ आणि दीर्घकाळात क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) सारखे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळे आणि त्वचेचे विकार: धुरामुळे (सिमेंट बारीक कनामुळे) डोळ्यांत येणारी जळजळ, लालसरपणा आणि त्वचेवर पुरळ येणे सामान्य झाले आहे. 
इतर परिणाम: मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होणे, हृदयविकाराचा धोका वाढणे आणि दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिक विटभट्ट्यांच्या धुरामुळे (कण मुळे)असेच तक्रारी नागरिक करत आहेत. भट्ट्या गावातच असल्याने हा धूर, (सिमेंटचे कण),थेट घरांमध्ये पोहोचतो, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब प्रभावित होते.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारी
गावकऱ्यांनी सांगितले की, सकाळी आणि संध्याकाळी भट्ट्यांचा कण इतका घनदाट होतो की घराबाहेर पडणे कठीण होते. शाळकरी मुले, वृद्ध आणि गरोदर महिला यांना विशेष त्रास सहन करावा लागतो. “हा बारीक कण आमच्या दैनंदिन जीवनात विष बनला आहे,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
*काय करणे गरजेचे?*
प्रशासनाने तातडीने कारवाई करावी: भट्ट्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. भट्ट्या गावाबाहेर हलवणे किंवा आधुनिक तंत्रज्ञान (जसे की झोन-फायरिंग किंवा इलेक्ट्रिक भट्ट्या) वापरणे आवश्यक.
नागरिकांसाठी सल्ला: मास्क वापरणे, घरात हवेशीर राहणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे. स्थानिक ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाने याबाबत त्वरित बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात.
या समस्येकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात गावातील आरोग्य संकट अधिक गंभीर होऊ शकते. प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. नागरिकांनी मागणी आहे की या गावातील सिमेंट वीट भट्ट्या त्वरित गावाबाहेर हलविण्यात याव्या.
