सडक अर्जुनी नगरपंचायत द्वारे २३ मार्च शहीद दिवस साजरा ; अमर शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
सडक अर्जुनी, दि. २३ मार्च २०२६: आजचा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी दिवस. २३ मार्च हा शहीद दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी १९३१ मध्ये लाहोर जेलमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढताना आपले प्राण पणाला लावले आणि फासावर चढले.
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक २३ मार्च २०२६ रोजीसडक अर्जुनी नगरपंचायतने या ऐतिहासिक दिवसानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करून देशाच्या अमर शहीदांना श्रद्धांजली वाहिली. 
यावेळी नगरपंचायतचे अध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शहीदांच्या बलिदानाची आठवण करून सांगितले की, “हे युवा क्रांतिकारी ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा देत गेले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावले. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, ते त्यांच्या त्यागामुळे शक्य झाले आहे. शहीद दिवस हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर देशभक्तीची शपथ घेण्याचा आणि राष्ट्रसेवेसाठी प्रेरित होण्याचा दिवस आहे.”
कार्यक्रमात नगरपंचायतचे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले गेले. अनेकांनी “शहीदों की चिताओं पर लगेंगे हर वर्ष मेले…” अशा ओळी म्हणून श्रद्धांजली व्यक्त केली.
सडक अर्जुनी नगरपंचायत दरवर्षीप्रमाणे यंदाही शहीद दिवस अभिवादन करून देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. जय हिंद! जय भारत!
