ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
गोंदिया, दि.23 : राज्य निवडणूक आयोगाचे 17 मार्च 2026 चे पत्रान्वये राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय एकूण 69 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 17 मार्च 2026 पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागु राहील.
तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 30 मार्च 2026. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक 7 एप्रिल 2026 ते 13 एप्रिल 2026 (शनिवार व रविवार वगळून), वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजतापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेनंतर. मतदानाचा दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (नक्षलग्रस्त व दुर्गम भागासाठी उदा. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यासाठी सकाळी 7.30 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत). मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक 29 एप्रिल 2026 (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.)
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 6 मे 2026 पर्यंत. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांनी कळविले आहे.
