वीटभट्टी व्यवसायका कडून लाच मागणारी ग्राम महसूल अधिकारी ACB च्या जाळ्यात
अर्जुनी मोरगाव – गोंदिया,दि.२४ः- विटभट्टी करीता लागणारी मातीच्या उत्खनवर कारवाई न करण्याकरीता फिर्यादीकडून ३३ हजाराची लाच मागून १० हजाराची लाच स्विकारतांना गायत्री बोरकर(वय 41,पद ग्राम महसूल अधिकारी साजा निमगाव क्र 10) तहसील कार्यालय अर्जुनी मोरगांव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याची कारवाई २३ मार्चच्या रात्री केली.
प्रकरण अशा प्रकारे आहे की, तक्रारदार यांचा विटभटीचा व्यसाय असून विटभटी करीता लागणारी माती गावातील विविध शेतकर्यांकडून आनत असतात मागील वर्षी मार्च 2025 मधे गैरअर्जदार तलाठी यानी तक्रारदार याना तुम्ही मातीचा अवैध उत्खन करता असे म्हणुन तक्रारदार यांचे कडून रु .33000/- घेऊन गेल्या त्यांतर पुन्हा या वर्षी दिनांक 12/03/2026 रोजी गैरअर्जदार ग्राम महसूल अधिकारी बोरकर यानी तक्रारदार याना फोन करुण अवैध मातीचे उत्खानावर कारवाही न करने करीता रु . 37000/- द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांचे कडे लाचेची मागणी करुण रु 10000/- दिनांक 12/03/2026 रोजी स्वीकारून उर्वरित 27000/- नंतर असे म्हणुन तक्रारदार यांचे कडून लाच रकमेची मागणी केली आहे तक्रारदार यांना ती लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 23.03.2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे फोन करून तक्रार सांगितली होती त्यावरून अर्जुनी मोरगाव येथे येऊन आलोसे असता यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती.
सदर तक्रारीवरून दिनांक 23. 03.2026 रोजी सापळा अधिकारी यांनी दोन पंचासह अर्जुनी मोरगांव येथे जाऊन तक्रारदार यांना पंचासह आलोसे यांचेकडे पाठवून लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांचेवेर मातीचे अवैध उत्खनना वर कारवाही न करने करीता तडजोडी अंती एकूण 35000 रु . रुपयांची मागणी करून त्यापैकी 10000/- रुपये दिनांक 12.03.2026रोजी स्वीकारल्याचे मान्य करून 23/03/2026 रोजी 10000रु . स्वीकारण्याचे मान्य करून व उर्वरित 15000/- रु दिनांक 24/03/2026 रोजी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.
दिनांक 23.03. 2026 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांचेवर अवैध मातीचे उत्खानावर कारवाही न करने करीता तक्रारदार यांचे कडून 10000/ रुपये लाच रक्कम स्वीकारून गैरफायदा घेतला आहे.
आरोपीची अंगझडती – आरोपीच्या अंगझडतीत लाच रकम 10000 /रुपये मिळून आले आहेत.आरोपी यांच्या ताब्यात Realme कंपनीचा किमती 3000 रु. चा 1 मोबाईल,ताब्यात घेण्यात आला आहे.आरोपीची घर झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.अर्जुनी मोरगांव जिल्हा गोंदिया येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महिला आरोपी असल्याने सर्वाच्च न्यायालायचे निर्देशानुसार दिनांक 24/03/2026 रोजी 07/00 वा पोलिस स्टेशन अर्जुनी मोरगांव येथे हजर रहाणे बाबद सुचना पत्र देऊन आरोपीचे पतीचे ताब्यात देण्यात आले आहे.कारवाई पथक-संयुक्त पोलीस निरीक्षक उमाकांत उगले व अरविंद राऊत , सहायक फौजदार चंद्रकांत करपे , पोलीस हवलदार संजय बोहरे, मंगेश काहालकर , पोलीस नाईक संतोष शेंडे, अशोक कापसे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलाश काटकर,मनापोशी संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक पोलीस नाइक दीपक बाटबर्वे यांनी केली.
