आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत नवेगावबांध येथे आरोग्य विषयक समितीची बैठक संपन्न
अर्जुनी-मोर. –अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे व उपकेंद्रांचे श्रेणीवर्धन करून तेथे अद्ययावत सुविधा पुरवल्या जातील.अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होत आहे. ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने तात्काळ भरून आरोग्य सेवा पूर्ववत करण्याचे निर्देश शनिवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय आरोग्य विषयक समितीकडून नवेगावबांध येथे बैठकीत देण्यात आले. 
या बैठकीला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले.आरोग्य सेवा रुग्णालय मुंबईच्या सहसंचालक डॉ.सुनीता गोल्हाईत,आरोग्य सेवा प्राथमिक मुंबई सहसंचालक डॉ.सरिता हजारे, नागपूर विभाग आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर, गोंदिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हर व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळीअधिकाऱ्यांनी,लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला पंचायत समिती अर्जुनी मोरगावच्या सभापती आम्रपाली डोंगरवार, सडक अर्जुनीचे सभापती चेतन वडगाये,जि.प.सदस्य सुधाताई रहागंडाले,माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे,प्रकाश गहाणे, कृ.उ.बा.स. सडकअर्जुनी सभापती डॉ.अविनाश काशीवार, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे,योगेश नाकाडे,माजी सरपंच डी.यु.रहांगडाले,विलास बागडकर,रामदास बोरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या मुंबई येथील अधिवेशनात आमदार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी क्षेत्रातील आरोग्य विभागाच्या दुरवस्थेचा मुद्दा लावून धरला होता. यावर सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार, राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दुर्गम भागाचा दौरा केला.महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
