Wednesday, March 25, 2026
सड़क अर्जुनी

पार्थ  ओमेश्वर कापगते यांची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

सडक अर्जुनी –  लोकसेवा विद्यालय कोसमतोंडी येथील विद्यार्थी पार्थ ओमेश्वर कापगते यांनी उल्लेखनीय यश संपादन करत जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव बांध (गोंदिया जिल्हा) मध्ये प्रवेशासाठी निवड मिळवला आहे. ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

पार्थ कापगते यांचे प्राथमिक शिक्षण गावाजवळील अगदी छोट्याशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेहळीटोला इथून झाले. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या मेहनतीमुळे त्यांनी या अत्यंत स्पर्धात्मक नवोदय प्रवेश परीक्षेत यश मिळवले.

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी पार्थ यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “पार्थसारखे विद्यार्थी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे उत्तम उदाहरण आहेत,” असे शिक्षकांनी सांगितले.

विद्यार्थ्याच्या या यशामागे त्यांच्या पालकांचे मोलाचे योगदान आहे. पालकांनी सतत प्रोत्साहन आणि पाठबळ दिल्यामुळे पार्थ यांना हे यश मिळवता आले. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

गावकऱ्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीनेही पार्थ यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. सर्वांनी त्याच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

अभिनंदन पार्थ!

तुमचे हे यश केवळ तुमचे नव्हे, तर तुमच्या शाळेचे, गावाचे आणि संपूर्ण परिसराचे आहे. भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा!

error: Content is protected !!