“आरोग्याची देणगी, रक्तदानाचा संकल्प आणि दिव्यांग बांधवांसाठी नवे चाक! बडोले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम
सडक अर्जुनी- माजी सामाजिक न्याय मंत्री व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार इंजी. राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर आणि सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २८ मार्च २०२६ रोजी सडक अर्जुनी येथील आमदार राजकुमार बडोले जनसंपर्क कार्यालयाजवळ, पंचायत समिती प्रांगण जवळ पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम:
आरोग्य शिबिर: सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
आयोजक: गंगाबाई मेमोरियल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अर्जुनी मोरगाव
रक्तदान शिबिर: सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
दिव्यांग बांधवांना ट्रायसायकल वाटप: दुपारी २:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
या सेवाभावी कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन मा. बडोले साहेबांच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने सार्थक करावे, अशी विनंती आयोजक राजकुमार बडोले मित्र परिवार यांनी केली आहे.
मा. राजकुमार बडोले यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनसेवेचा वारसा पाहता, हा कार्यक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, खऱ्या अर्थाने समाजातील गरजूंसाठी उपयुक्त ठरणारा असेल. आरोग्य तपासणी, रक्तदान आणि दिव्यांग बांधवांसाठी ट्रायसायकल वाटप यासारख्या उपक्रमांमुळे अनेकांना प्रत्यक्ष फायदा होईल.
आपली उपस्थिती हीच आमची प्रेरणा!.
या सेवाभावी उपक्रमात सहभागी होऊन आपणही या चांगल्या कार्याचा भाग व्हाव असे राजकुमार बडोले फाऊंडेशन आणि राजकुमार बडोले मित्र परिवारा द्वारे कळविण्यात आले आहे.
