Tuesday, March 31, 2026
बड़ी खबरमहाराष्ट्र

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा आज सकाळी नागपूरजवळ अपघात

नागपूर, ३० मार्च २०२६: भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज दिनांक 30  मार्च रोजी सकाळी नागपूरजवळ अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यासोबतचे सहकारीही किरकोळ दुखापत झाले. अपघात भीषण स्वरूपाचा असला तरी जीवितहानी टळली आणि सर्वजण सुखरूप असल्याचे वृत्त आहे.

अपघात कसा घडला?

खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी दिल्ली येथील अधिवेशनासाठी जात असताना हा अपघात घडला. खासदार पडोळे भंडाऱ्याहून नागपूर विमानतळाकडे जात असताना हा नागपूर जवळील हल्दीराम जवळ हा अपघात घडला. सकाळ चे  सुमारास त्यांच्या टोयोटा फॉर्च्युनर (एमएच ३६ एपी ९९११) या वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेतली.

अपघातात खासदार पडोळे, त्यांचे सहकारी आणि चालक होते. पडोळे यांना पायाला जखमा सौम्य असल्याने सांगितले जाते. ते आता दिल्ली ला अधिवेशनासाठी गेले असल्याची माहिती मिळाली. सांगायचे म्हणजे त्याच रस्त्यांवर तिसऱ्यांदा त्यांचा ट्रॅक द्वारे अपघात झाला आहे. समोरील तपास पोलिस विभाग करीत आहेत.

error: Content is protected !!