नगर पंचायत सडक अर्जुनी द्वारे एकल महिला सक्षमीकरण कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
सडक अर्जुनी – डॉ.सुशिल लाडे : नगर पंचायत सडक अर्जुनी महिला बालकल्याण समिती च्या वतीने एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष कार्यशाळा आज दिनांक 30 मार्च रोजी तेजस्विनी लॉन येथे आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली असून, त्यात एकल महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर बाबतीत सक्षम करण्यावर भर देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष तेजराम मडावी, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नगरसेवक देवचंद तरोने, महेंद्र वंजारी, कामिनी कोवे, डॉ. रीता लांजेवार, शशी टेंभुर्णे, अंकित भेंडारकर, तथा पदाधिकारी, मुख्याधिकारी सारंग खांडेकर, यूगल दडमल, नगरपंचायत चे कर्मचारी, तसेच एकल महिला संस्थेचे अनिल मेश्राम सर, वैद्यकीय अधिकारी, संपादक आणि पत्रकार एकल महिला चे सभासद उपस्थित होते. नगरपंचायत च्या महिला बालकल्याण समिती द्वारे 5 टक्के स्थानिक निधी मधून उपस्थित महिलाना साडी भेट देण्यात आली.

कार्य शाळेचे महत्व –
कार्यशाळेत मुख्यतः एकल महिलांच्या समस्या, सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा, स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, आत्मनिर्भरता आणि सामाजिक सुरक्षितता यासारख्या विषयांवर चर्चा आणि प्रशिक्षण देण्यात आले. व्यावसायिक प्रशिक्षक, महिला विकास अधिकारी, कायद्याचे तज्ज्ञ आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश:
आर्थिक सक्षमीकरण: स्वयं-सहायता गट (SHG), मुद्रा योजना, उमेद अभियान, सारख्या योजनांद्वारे कर्ज आणि अनुदान कसे मिळवावे याबाबत सविस्तर माहिती.
कौशल्य विकास: हस्तकला, सिलाई-कढाई, खाद्यप्रक्रिया, डिजिटल साक्षरता आणि छोट्या व्यवसायांसाठी प्रशिक्षण.
कायदेशीर जागरूकता: एकल महिलांसाठी उपलब्ध वारसा हक्क, भरणपोषण, घरगुती हिंसाचार विरोधी कायदे आणि सरकारी सहायता योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मानसिक आणि सामाजिक समर्थन: आत्मविश्वास वाढवणे, तणाव व्यवस्थापन आणि समूहाद्वारे एकमेकींना पाठबळ देण्याचे महत्त्व. प्रमुख पाहुण्यांनी एकल महिलांना सरकारी योजनांचा पूर्ण लाभ घेण्याचे आवाहन केले आणि भविष्यात अशा अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या एकल महिलांनी आपल्या अनुभवांचा शेअर केला. अनेक महिलांनी सांगितले की, “या कार्यशाळेमुळे आम्हाला नवीन दिशा मिळाली आहे. आता आम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू करण्यास तयार आहोत.”
या कार्यक्रमात सुमारे 150 च्या वर एकल महिलांनी सक्रिय सहभाग घेतला .
नगर पंचायत सडक अर्जुनी च्या या उपक्रमाचे स्थानिक स्तरावर स्वागत करण्यात आले आहे. एकल महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
