Tuesday, April 14, 2026
लाखनीभंडारासाकोली

माजी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद उपक्रम : दिव्यांग मित्राला टू-व्हीलर भेट देत दिला प्रेमाचा संदेश

MKM NEWS 24 – डॉ. सुशिल लाडे…..

साकोली – प्रतिनिधी :  मित्रांनो आजच्या घडीला मित्र म्हणजे फक्त स्मार्ट फोन, व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम,सोशल मिडिया वर हजारो मित्र असतात. पण खरे मित्र तेच असतात जे आपल्या अडचणीला सुखदुःखाला धावून येत असतात.

अशीच एक सुखद घटना मित्र परिवारात घडली आहे साकोली येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातील माजी मित्रांनी मित्रांनी आपल्या दिव्यांग मित्राला न विसरता सुखद आनंद देत त्याच्या मदतीला धावून आले.

मित्रत्व, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दर्शवणारी एक हृदयस्पर्शी घटना तालुक्यात घडली आहे. साकोली येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मित्रांनी आपल्या दिव्यांग मित्राला म्हणजेच अशोक भालेराव  प्रॉपर रामपुरी चा असून मु . मुरमाडी तालुका लाखनी यास दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी  मदतीचा हात देत त्याला टू-व्हीलर भेट दिली. मित्र परिवारात राहुल भोरजारे, राकेश बावनकर, राकेश कोचे, संकेत लिचडे, सपन कापगते, गजेंद्र गोखले, मंगेश राऊत, कमलेश खंडाते, पंकज जांभूळकर इत्यादी साकोली येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मित्रांनी आपल्या दिव्यांग मित्राला एक हात प्रेमाचा साथ मदतीचा म्हणत टू व्हीलर गाड़ी भेंट म्हणून दिली.

सांगायचे म्हणजे सदर मित्र अशोक  भालेराव हा  रामपुरी, मु. मुरमाडी येथील राहणारा असून लाखनी तालुक्यातील आहे. अशोक हा जन्मापासूनच पोलिओ ग्रस्त आहे. अशोक भालेराव  इलेक्ट्रॉनिक्स शाखेचा माजी विद्यार्थी असून, शारीरिक अडचणींमुळे त्याच्या दैनंदिन जीवनात अनेक अडथळे येत होते. ही बाब लक्षात घेऊन त्याच्या मित्रपरिवाराने एकत्र येत आर्थिक मदत गोळा केली आणि त्याला TVS Excel Heavy Duty 100 ही दुचाकी भेट दिली.

या उपक्रमामुळे त्या दिव्यांग मित्राच्या जीवनात मोठा बदल होणार असून, त्याच्या स्वावलंबनाला चालना मिळणार आहे. तसेच या कृतीतून समाजात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे की, मित्रत्व केवळ शब्दांपुरते मर्यादित नसून, गरज पडल्यास कृतीतूनही ते सिद्ध करता येते.

या प्रसंगी उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला.

“एकमेकांना साथ देत पुढे जाणे हाच खरा समाजाचा विकास आहे,” असा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

error: Content is protected !!