Tuesday, May 13, 2025
गोंदियासड़क अर्जुनी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने वनपरीक्षेत्र कार्यालय कोहमारा द्वारे भव्य रॅली व वृक्षरोपण

सडक अर्जुनी –दि.13|08/2022रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने वनपरीक्षेत्र कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम करून सडक अर्जुनी परीक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक कोहमारा, सौन्दड, कोसमतोंडी, डव्वा, जांभडी, रेंगेपार,डोंगरगाव, तेंदू वनपाल, तेंदू वन रक्षक व वन क्षेत्रातील सर्व नियत क्षेत्र रक्षक व कार्यालयीन वनकर्मचारी यांचे वतीने

सडक अर्जुनी येथील मा. दिवाणी व फौंजदारी न्यायालय येथे सकाळी 10.00वाजता जाऊन न्यायालय परिसरात मा.विक्रम मोहोड सर, मा. न्याय दंडाधिकारी, ठाणेदार श्री.सचिन वांगळे व तहसीलदार श्री.किशोर बागडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती श्री. वाघाये साहेब व सडक अर्जुनी येथील पत्रकार यांचे हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर सडक अर्जुनी तालुक्यातआझादी का अमृत महोत्सव निमित्ताने वन संरक्षण, वन्य प्राणी, संरक्षण, पर्यावरण, व जैविक विविधता याबाबत, शालेय विद्यार्थी, सर्व सामान्य जनता यांना प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅली ला मा. न्याय दंडाधिकारी व ठाणेदार सडक अर्जुनी यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर डोंगरगाव डेपो येथे वसंत विद्यालय येथे व आदिवासी आश्रम शाळा शेंडा येथे कार्यक्रम घेऊन जण जागृती करण्यात आली. व मार्गदर्शन केले. त्यानंतर डव्वा, जांभडी, कोसमतोंडी, सौन्दड, व कोहमारा, सडक अर्जुनी येथे रॅली प्रचार प्रसिद्धी करून रॅलीची सांगता सडक अर्जुनी वन परीक्षेत्र कार्यालय येथे करण्यात, या वेळी सडक अर्जुनी येथील सर्व पत्रकार उपस्थित होते.

error: Content is protected !!