Wednesday, May 14, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी -बाथरूम चे सांडपाणी चक्क मोटार चे पाईक द्वारे रस्त्यावर,नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सडक अर्जुनी – डॉ.सुशील लाडे – नगरपंचायत सडक अर्जुनी  प्रभाग क्रमांक 7 येथील मेमन मोबाईल दुकान पासून जाणाऱ्या रोड हा प्रभाग क्रमांक 7 येथील राहणाऱ्या नागरिकांकरीता आवागमन करण्यासाठी मुख्य रोड आहे. सांगायचे म्हणजे काही प्रतिष्ठित व्यक्रिं चक्क आपल्या बाथरूम (गटार) चा सांडपाणी  इलेक्ट्रिक मोटार द्वारे रात्रीला ह्या रस्त्यावर सोडत असतात.

त्यामुळे उग्र असा वाश प्रभाग क्रमांक 7 येथील नागरिकांना सहन करावा लागतो. आणि रोडला उतार असल्यामुळे हा सांडपाणी रस्त्यावर पसरून नागरिकांच्या घरासमोर जात असतो.आणि कधी कधी जमा असतो. त्यामुळे डास,डेंग्यू ,मलेरिया ,मुळे आरोग्याला धोकादायक हानिकारक आहे.

कित्येक दिवसांपासून हा असला चुकीचा प्रकार सुरू असून जवळ पास राहणाऱ्या नागरिकांनी ह्या बदल फोटो काढून तक्रार देल्याची सांगितले जाते.

परंतु कोणत्याही प्रकारची कारवाही करण्यात आली नसावी म्हणून हा असला चुकीचा प्रकार आता सुद्धा सुरू आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम 1965 अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर सांडपाणी घालण्यास मनाई आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता, नाकारता येत नाही.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका नागरिकांनी सांगितले आहे की कित्येक वेळा रात्रीला मोटार द्वारे सांडपाणी रस्त्यावर सोडत असतात त्यामुळे आम्हाला खूप त्रास होहुन उग्र वाष सहन करावा लागतो. आमचे कडे लहान मुले असून त्यांना सुद्धा आरोग्याचा धोका निर्माण होईल. करीता नगरपंचायत ने बंदोबस्त करावे अशी प्रभागातील नागरिकांनी  मागणी केली आहे.

ह्या बद्दल MKM news 24 ने , नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी (“सर्व प्रकारची चौकशी करून संबंधित व्यक्तीला आपल्या सांडपाण्याची वेवस्था करण्यास कडवू किंवा काही उपाय योजना करू “) असे सांगितल.

error: Content is protected !!