Wednesday, January 28, 2026
सड़क अर्जुनी

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते धान खरेदीला शुभारंभ

सडक अर्जुनी :MKM न्यूज 24- गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी लाखो टन धान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाकडून खरेदी केले जाते. सन २०२२-२३ या वर्षासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र मंजूर केलेली आहेत.
पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत आज ११ नाव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते धान खरेदीचा शुभारंभ गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्या मधील सौंदड येथील सहकारी धान गिरणी मर्या सौंदड, या खरेदी केंद्राना प्रत्यक्ष भेट देवून करण्यात आला आहे.
धान खरेदी शुभारंभाला रमेश आडे,पुरवठा (उपायुक्त) नागपूर, लीना फालके मॅडम, जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया , अनिल बन्सोड,जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा , बाचपेई DMO गोंदिया, देशमुख ADSO गोंदिया, हल्मारे जी नायब तहसीलदार सडक अर्जुनी, विनोद काळे निरीक्षण अधिकारी अर्जुनी मोर, पी. कापडे पुरवठा निरीक्षक सडक अर्जुनी, त्याचप्रमाणे रमेश जी चुऱ्हे अध्यक्ष सह.भा. गी. सौंदड, आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!