रविवारला खोडशिवणी येथे तालुका विधी सेवा समिती द्वारा विविध शासकीय योजनांचे महशिबिर
रविवारला खोडशिवणी येथे तालुका विधी सेवा समिती द्वारा विविध शासकीय योजनांचे महशिबिर
सडक अर्जुनी – MKM news 24 – तालुका विधी सेवा समिति सडक अर्जुनी द्वारा खोडसिवनी येथे विविध शासकीय योजनांचे भव्य महाशिबिर दि १३/११/२०२२ रोज रविवार ला सकाळी १० वाजता प्राथमिक स्वास्थ्य केंद्र समोरील पटांगणावर आयोजित करन्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथि मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपिठाचे न्यायमूर्ति मा श्री अविनाश घरोटे साहेब, प्रमुख अतिथि मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपिठाचे न्यायमूर्ति मा श्री महेन्द्र चंदवानी साहेब, अतिथि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया मा श्री अरविन्द वानखेड़े साहेब,जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे मॅडम गोंदिया, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री अनिल पाटील साहेब,जिल्हापोलीस अधिक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांचे ऊपस्थीत संपन्न होत आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ घ्यावा .