सडक अर्जुनी येथे मंडई निमित्त 14 डिसेंबरला मराठी लावणी ऑर्केस्ट्रा आणीं खडा तमाशा चे आयोजन
MKM NEWS 24 – संपादक – डॉ.सुशील लाडे
सडक अर्जुनी – विज्ञान युगात मंडई, मेला, दंडार, नाटकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही लोककला जोपासली जात आहे. ग्रामीण कलावंतांना या मंडई उत्साहात झाडीपट्टी रंगभूमिका लेखक, कलावंत दिले आहेत. यातूनच झाडीपट्टी रंगभूमिची निर्मिती होवून अनेक रंगभूमी उदयास आल्या आहेत. गावात सादर होणाऱ्या नाट्य मंडळांना रसिकांनी सुद्धा प्रतिसाद दिले जाते.

सडक अर्जुनी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. आपल्या परंपरे सूनार या वर्षी सुद्धा नव युवक मंडई मंडळ सडक अर्जुनी च्या आयोजकांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी मंडई चे आयोजन केले आहे आणि त्या निमित्ताने संगीत राष्ट्रीय खडा तमाशा व दंडारीचे चे आयोजन सकाळी 9.30 वाजता( स्थळ दुर्गा मंच स.अ.) चंद्रमुखी मराठी लावण्या आणि ऑर्केस्ट्रा रात्री 9.30 वाजता (स्थळ जी. प.हाय.पटांगण स/अ.) आयोजित करण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे दंडारीला विविध प्रकारच्या पारितोषिके बक्षिसे दिले जाणार आहे.
दिवाळीनंतर गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र मंडई सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होते. पूर्व विदर्भात सगळीकडेच या मंडईने उत्सवानिमित्त रात्रीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते यावेळी गावातील नागरिक एकत्रित येत सामाजिकतेचा संदेश देत असतात.